Today we are going to talk about a group of society that includes me.
When a child is born, if it is a girl then the only goal of a family is to get her educated and get her married. When a boy is born he is supposed to do Graduation, Engineering (Doctors, Lawyers are seldom of a common man’s house) and then get a job, get settled and then marraige. Infact all of this would have been decided before the child is born.
No one ever thinks of making their child an entrepreneur. They are also right because doing business is not easy, there are many difficulties. Let’s talk about it all but in the next blog. Now just about dreams.
Middle class people often comes from big-small scale business category, job or some of them do farming for survival. Such parents mostly think that they have not been able to make emmense wealth by working hard all their lives, so basically they are afraid of what the child will do. As the children gets older, their education goes on and if the child is brilliant/smart parents wish that he could be a doctor, an engineer or else can secure recruitment in any government sector so that he can get a job.
In the course of life, child observes the hardship of the parents, helps them in their business/industry. (There is a difference in business and industry. Business is portable, industry is vast).
Then gradually while helping the parents children become proficient in that work. Circumstances force them to do this.
While doing all this, the boy begins to see the world, to dream big. Movies, serials show what a business is. His mind makes up that if he wants lot of money in life, he can earn it only by doing business. With all this, he looks at the interviews of some of the entrepreneurs, their lives, read their biographies and he also begins to realize that a job will only get him a home and a car so far.
Now the boys begins to proceed for college life. He doesn’t know where to get admission or he still doesn’t know what he actually wants to do next but he knows what the family wants him to do. The boy then gets enrolled in a reputed college. After five to six years of consistent efforts and hardwork he achieves his degree. Even after that his actual goal in life isn’t clear.
The reason for it can be explained with an example, if he becomes an Engineer like me, then even after six years of hardwork that took me to get the degree based on that outdated education system anyone will think we will do a good job. But do we know the real situation? When the boy comes out of college life and enters in real life full of consequences he realizes that what we have actually learned?
There is no such thing as good job in this world of competition. After spending all of the saving of parents in his education he still require money to present as a bribe to get a good job and between this his age doesn’t wait. He has to think of his own carrier, he need to get settled, needs to buy a house, needs to think of marraige and again our society add on to this by tuanting him about his future.
All these things force him to get stucked in the stress of job. In the end he accepts any of the job and…..and those business dreams of that middle class boy are locked in a box and he keeps peeping at those dreams from time to time.
मिडल क्लास बॉय आणि बिझनेसची स्वप्नं
आज आपण समाजाच्या अशा समुहाची गोष्ट करणार आहोत ज्यात माझाही समावेश आहे.
बाळ जन्माला येतं, ती मुलगी असली तर तिला शिकवून लग्न करून देवू हे एकच ध्येय आणि मुलगा झाला तर इंजिनिअरींग, ग्रॅज्युएशन (डॉक्टर, वकील क्वचितच सर्वसामान्यांच्या घरातून होतात) आणि मग जॉब व सेटेल झाले की लग्न. जर म्हणायला गेलं तर हे सर्व बाळ जन्माला यायच्या आधीच ठरवलेलं असतं.
कधी कोणी आपल्या मुलाला उद्योजग बनवू असा विचारही नाही करत. त्यांचं पण बरोबरच असतं कारण उद्योग करणं सोपं नसतं, खूप अडचणी येतात. ते सर्वही बोलूया आपण पण पुढच्या ब्लॉग मध्ये सध्या तर स्वप्नांन पुरतचं.
मिडल क्लास म्हटलं म्हणजे छोटा मोठा धंदा, नोकरी, शेती व्यवसाय करणारे. त्या आई वडिलांचं पण योग्यच असतं ना हो, आपण आयुष्यभर कष्ट करून इतकी संपत्ती गोळा करू शकलो नाही तर मुलगा काय करेल हीच भीती त्यांना देखिल असतेचं. मुलं मोठी होत जातात, शिक्षण चालू होतं त्यात मुलगा हुशार असेल तर डॉक्टर, इंजिनियर, सरकारी भरती किंवा कुठलीही पदवी घेईल जेणे जेणेकरून त्याला नोकरी करता येईल अशी मानसिकता असते.
आयुष्याची वाटचाल करता करता मुलगा आई वडिलांचे कष्ट बघतो, त्यांना त्यांच्या धंद्यात/ उद्योगात मदत करतो. (धंदा आणि उद्योग यात पण फरक करता येतो. धंदा म्हटला की छोटा, उद्योग म्हटला की खूप काही मोठं असच). मग हळू हळू आई वडिलांना हातभार लावता लावता मुलं त्या धंद्यात/उद्योगात निपून होतात, कूशल काम करतात. हे करायला त्यांना परिस्थितीच भाग पाडते.
हे सर्व करताना मुलगा जग पाहायला सुरुवात करतो, मोठे स्वप्न बघतो. मूव्हीज् सीरीयल्स मध्ये हे दाखवण्यात येतं की बिझनेस काय चीज असते. आयूष्यात खूप पैसा हवा असेल तर तो बिझनेस करून च मिळवता येतो हे त्याच्या (मुलाच्या) मनात कुठेतरी घर करत असतं. त्यातल्या त्यात काही उद्योजगांच्या मुलाखती, त्यांचे आयूष्य, बायोग्रफी तो बघतो आणि त्याला पण हे पटायला लागत की नोकरी करून जास्तीत जास्त एक घर, एक कार इतकचं होऊ शकतं.
आता मुलाच्या आयुष्यात कॉलेज ही संकल्पना येते. ॲडमिशन कुठे घ्यावं हे त्याला सुचत नाही किंवा त्याला अजूनही हे माहीत नसतं की आपण पुढे नक्की काय करायचं आहे पण घरच्यांना आपल्याकडून काय करून घ्यायची इच्छा आहे हे त्यांना ठाऊक असतं. मग तो मुलगा एखाद्या नामांकित कॉलेज ला प्रवेश घेतो. पाच ते सहा वर्षाच्या अथक परिश्रमाने तो त्याची पदवी संपादीत करतो. इतक्या वर्षांनी देखील मुलाचं ध्येय निश्चित नसतं की त्याला काय करायचं आहे.
हे असं होणारचं ना, उदाहरण घेऊया जर तो आमच्या सारखा इंजिनिअर झाला तर सहा वर्ष देऊनही त्या आऊट डेटेड (अतिप्राचीन) शिक्षण प्रणालीचा आधार घेऊन त्याला असंच वाटतं की आपण मस्त जॉब करू पण कॉलेज मधून बाहेर पडल्यावर त्याला हे कळतं की आपण जे शिकलो आहे त्यावर इथं कुठं चांगला जॉबचं नाहीये. वर्षाचे लाख दोन लाख खर्च करून त्याला चांगल्या जॉब साठी अजून पैसे खर्च करावे लागतात यात त्याचे वय चोवीस (२४) च्या आसपास येऊन गेलेलं असतं, त्यातल्या त्यात लग्नाची चिंता, परिवाराची चिंता, सोसायटीचे टोमणे त्याला त्याचे बिझनेसचे स्वप्नं मागे टाकायला मदत करतात. जॉबच्या त्या तनावामध्ये अडकायला त्याला भाग पाडतात, शेवटी या सर्वांच्या आधारावर तो जॉब स्वीकारून जॉब करतो आणि….. आणि ते मिडल क्लास बॉयची ती बिझनेसची स्वप्नं एका पेटीत बंद होतात आणि तो त्या स्वप्नांना अधून मधून डोकावून पहात असतो.