*Mejvani (Feast)* As we hear the name “Mejvani (Sumptous Feast)” the very first image strikes through our mind is the dish full of “Panch-Pakwanna” i.e “Five Rich Recipes” (Mostly famous among Maharashtrians). Panch Pakwanna means five sweets in one meal. Puranpoli, Basundi, Kheer, Shreekhand, Sheera are few examples of that dish.There is a specific place in a plate where those sweets to be served during meal. Like Kheer, basundi is served on the left side of banana leaf (dish) in a bowl while shreekhand is served next to the salt on leaf itself instead of a bowl. In the list of these dishes Jalebi, Gulabjamun, Gulpoli (Jagerry stuffed Roti), etc are not far behind either. However, in many feasts “Kheer” is the star dish of the meal. Although it’s existence depends on milk, in some states the characteristics of kheer is different and the method of preparation is also different. Just as kheer is made from Rice or Semolina in Maharashtra, it is made from “Sevaiya” (wheat noodles) in Kerala and Tamil Nadu. Kheer also has different name according to its method and ingredients used. In Southern States kheer is reffered as “Payasam” and in some parts of Northern India, kheer is called “Firni”. Ramadan Eid is one of the most celebrated festivals in India by the Muslim brotherhood. On this day, kheer is made to enhance the sweetness of the relationships and the kheer made on this day is called “Sheer-Khurma”. The main feature of this dish is the amount of raisins and dry fruits added to it. Sheer-Khurma is usually made from Sevaiya and uses milk and ghee in equal proportions. The aroma of ghee and the nutritious dry fruits enhances the taste of the dish. The real taste of this dishes is enhanced by dry fruits (Raisins, Cashews, Almonds, Poppy seeds and Buchanania lanzan mainly known as Charoli or Chironji). Puranpoli or Puri goes as a best combination with this delicious dish. Just like kheer, “Basundi” is also a star dish of the feast. The true nature of Basundi depends on the quantity and manner in which the milk is skimmed. If Basundi is cooked little more, it becomes “Rabadi” and if added Rasgullas to it the dish prepared is called “Rasmalai”. When we thicken the Rabadi a bit the resulting product is known as “Mawa” and if the Mawa is further thickened a little more, it becomes “Peda”. As the process of preparation of these products takes longer, the taste and price of these products also increases. They say, “Gold does not know it’s purity unless it is heated” just like that “Milk doesn’t get its value until it is skimmed”. Now Diwali has just been celebrated. Diwali is considered to be one of the auspicious festival in India. Snacks (Faral) made in this festival is an excellent addition to the feast. The snacks made during this time are Chivda, Chakali, Sev, among the spicy dishes. Laddu, Karanji, Shankarpali, Anarase, Nankhatai, are the sweet snacks. Let’s have a brief look at these different types of delicacies. Round and beautiful laddu is the first centre of attraction among those delicacy for Diwali. Laddu is made using different ingredients like semolina, gram flour, boondi or black gram. Another sweet is Karanji. As much as it takes efforts to make Karanji, it also tastes that good to eat. The semolina, dry fruits, sugar and desiccated coconut are roasted in ghee until all the mixture gets a smooth binding. Flour is kneaded delicately to make a soft dough. Then fine beehives are rolled out and the roasted mixture is stuffed as a filling inside it and it is deep fried into oil/ghee.Another dish made on Diwali is “Anarase”. The total duration of making this this dish is of one week. For this purpose, the rice is soaked into water for three days, then it is dried and finely ground into a powder. Jaggery or sugar is added into the powder as per desired amount and then dough is kneaded and kept for about three to four days in an air tight container for fermentation. Once the mixture is well fermented it is rolled into small balls, coated with poppy seeds and then fried in ghee. Shankarpali and Nankhatai are made using all purpose flour, powdered sugar and ghee. The only difference is that the Shankarpali’s mixture is rolled and cut into small diamond shaped pieces and fried in ghee or oil while the Nankhatai is hand shaped into small balls and baked in an oven or bakery. Each of these dishes tastes different. You all must have tasted these dishes. Let us know your reviews in the comments about this blog. We will soon share with you the recipes of the dishes mentioned in the blog. Thank you.
मेजवानी
मेजवानी म्हटलं की पटकन डोळ्यासमोर उमटणारी छबी म्हणजे पंच पक्वान्नाचे ताट. मेजवानीच्या जेवणातील मुख्य गोड पदार्थ म्हणजेच पक्वान्न. पंच पक्वान्न म्हणजे एका जेवणात पाच गोड पदार्थ. पुरणपोळी, बासुंदी, खीर, श्रीखंड, शिरा ही काही पक्वान्नांची उदाहरणे. जेवणाच्या ताटात पक्वान्न वाढायची सुद्धा एक जागा ठरलेली असते. जसे खीर, बासुंदी ही वाटीत पानाच्या डावीकडे वाढली जाते तर श्रीखंड वाटी ऐवजी पानात मीठा खाली वाढले जाते. या पक्वान्नांच्या यादीत जिलेबी, गुलाबजाम, गुळपोळी, इ. हे सुद्धा मागे नाहीत. तरी अनेक कार्यात “खीर” हे मुख्य पक्वान्न म्हणुन केले जाते. खीर बनवताना तिचं अस्तित्व दुधावर अवलंबून असलं तरी काही राज्यांमध्ये खीरीचं वैशिष्ट्य वेगळं आहे व बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. जसे महारष्ट्रात खीर तांदूळ किंवा रव्याची केली जाते तसेच केरळ, तामिळनाडू या दक्षिणी भागात शेवयांची खीर बनवली जाते. यांच्या पद्धती व वापरल्या जाणाऱ्या सामग्री नुसार खीरीचे नावही वेगळे आहे. दक्षिणी राज्यात खीर ला “पयासाम” म्हणुन संबोधले जाते तसेच काही उत्तर भारतीय भागात खीरीचे “फिरनी” असे नाव आहे. भारतात मुस्लीम बांधवांतर्फे साजरा होणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे रमझान ईद. या दिवशी आपुलकीचं नातं जपत नात्यातील गोडवा वाढावा म्हणून खीर बनवण्याची प्रथा प्रचलित आहे आणि या दिवशी बनवल्या जाणाऱ्या खीरला “शीर-खुरमा” असे म्हणतात. या शीर-खुरम्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात टाकले जाणारे मनुके व ड्राय फ्रूटस् चे प्रमाण. शीर-खुरमा सहसा शेवयांचा बनवला जातो व त्यात दूध आणी तुप हे समप्रमाणात वापरले जाते. तुपाचा सुगंध व त्यात पौष्टीक ड्राय फ्रूटस् या पदार्थाची चव अजूनच वाढवतात.मेजवानीतील कोणत्याही पदार्थाची खरी चव ड्राय फ्रूटस् (मनुके, काजू, बदाम, चारोळी, खसखस) वाढवतात. या मधुर पक्वान्नाच्या सोबतीला पुरणपोळी किंवा पुरीची छान जोड होते. अगदी खीर प्रमाणे बासुंदी देखील मेजवानीतील मुख्य आकर्षणाचा विषय ठरते. बासुंदी चे खरे वैशिष्ट्य दूध किती प्रमाणात व कसे आटवले जाते यावर ठरते. बासुंदी थोडी अजून आटवली तर ती “रबडी” बनते व यात दुधापासून बनणारे छोटे रसगुल्ले टाकले तर त्या पदार्थाचे नाव “रसमलाई”. रबडीला चुल्हीवर जरा अजून उब दिली तर तयार होणाऱ्या पदार्थाला “मावा” म्हणतात आणि हा मावा अजून आटवला तर त्याचा “पेढा” बनतो. जस जसे या पदार्थांची बनवण्याची कृती लांबत जाते तस तसे त्या पदार्थांची चव व किंमत ही वाढत जाते. ते म्हणतात ना, “सोनं तापवल्याशिवाय त्याची शुद्धता कळत नाही” तसेच दूध आटवल्या शिवाय त्याचे मूल्य वाढत नाही. आता नुकतीच दिवाळी साजरी झाली. भारतात साडे तीन मुहुर्तांपैकी एक समजला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या फराळाचा मेजवानीत उत्कृष्ट समावेश आहे. या दरम्यान बनवले जाणारे फराळ म्हणजेच चिवडा, चकली, शेव हे काही चटाकेदार पदार्थ. तसेच लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, नानकटाई हे गोड मेजवानीचे पदार्थ. या पदार्थांचे प्रकार ही वेग वेगळे असतात ते आपण थोडक्यात बघूया दिवाळीतील गोड मेजवानीचे पदार्थांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे म्हणजे गोल व सुंदर दिसणारे लाडू. लाडू हे रवा, पिठी, बेसन पिठ, बुंदी, उडद डाळ असे वेग वेगळे पदार्थ वापरून बनवले जातात. दुसरा गोड पदार्थ आहे करंजी. करंजी बनवायला जितकी मेहनत आहे तितकीच खायला देखील ती चविष्ट लागते. रवा, ड्राय फ्रूटस्, साखर, ओले खोबरे यांना साजूक तुपात भाजून मस्त लुसलुशीत सारण तयार केले जाते. नाजूक हाताने मैदा मळून त्याची कणीक तयार करून बारीक पोळ्या करून त्यात हे सारण भरून त्या करंजीला सूर्यफूल (अख्खी गोल) किंवा अर्ध चंद्र असे मनमोहक आकार दिले जातात व खमंग तेलात अथवा साजूक तुपात खरपूस तळून घेतली जाते. दिवाळीत बनवला जाणारा अजून एक पदार्थ म्हणजे अनारसे. अनारसे बनवायचा एकुण कालावधी एक आठवड्याचा असतो. या पदार्थासाठी आधी तीन दिवस तांदूळ भिजवून ठेवला जातो नंतर त्याला वाळवून बारीक पिसून घेतला जातो व त्यात आवडी प्रमाणे गूळ किंवा साखर टाकून ते पीठ मळून काही दिवस मुरायला (एकजीव होऊन त्यातील चव वाढायला) ठेवले जाते. मिश्रण अगदी नीट एकजीव झाले की त्याचे छोटे गोळे करून त्यांना हातावर थापून वरच्या बाजूने मस्त खसखस लावून साजूक तुपात तळून घेतले जातात. शंकरपाळी व नानकटाई हे पदार्थ मैदा, पिठी साखर व तूप वापरून बनवले जातात. फरक इतकाच की शंकरपाळी चे मिश्रण लाटून घेऊन त्याचे छोटे काप करून साजूक तूप किंवा तेलात तळून घेतले जातात तर नानकटाई चे मिश्रण चे छोटे गोळे हाताने पेढ्याएवढा आकार करून ओव्हनमध्ये किंवा बेकरीत जाऊन भट्टिवर भाजून (बेक) करून घेतले जातात. या प्रत्येक मेजवानीतील पदार्थांची चव निराळी असते. तुम्ही सर्वांनी हे पदार्थ चाखलेच असतील. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. या ब्लॉग मध्ये उल्लेख केलेल्या पदार्थांची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करू.