Most of us do not realize how lucky we are to have our siblings. The unconditional love for a brother or sister is something that should not be taken for granted. Even more than the friends or parents, siblings have been right by our sides through the awkward, embarrassing, joyous, and miserable times of our lives. We often claim that our middle-school and high-school friends saw us at our worst and although this is true, our siblings were there behind the scenes at home. Even without direct conversation, our brothers and sisters have always been listening.An elder sibling is like a second parent to the younger one. Infact a sibling is your bestfriend. Though you may not call your sister your best friend, she is. And no matter how many times your brother makes fun of you, he will always have your back. Now some of you guys may say, “That’s not true. They use your secrets to blackmail you.” Okay fine but does that in anyway hurt you?Yes, sisters and brothers do blackmail each other with their secrets but in the end their secrets are safe within them. Siblings may fight and argue with each other every now and then but at the end of the day they are the ones you can’t get rid of. The deeper bond they share can’t be explained through words.As an elder sister I have experienced all of these emotions with my younger brother. We have almost Eleven years of age difference and I must say it is never too late to create a better relationship with your younger or older sibling, despite any age difference. What I have discovered within this journey is that “You don’t have to give birth to be a mother but a child can give birth to the motherhood in you”. I’m truly blessed to be a second mother of my sweet little brother.It is really difficult to pen down such emotions they can only be felt and those who feel it are blessed. ️
तुम्हीही केला नसेल तायडी अन् भावड्याच्या नात्याचा असा विचार…
आपल्यातील बऱ्याच जणांना ही जाणीव होत नाही की भावंड असणं म्हणजे भाग्यवान असणं. भाऊ किंवा बहीणीकडून मिळणारं निस्वार्थ व निर्मळ प्रेम कधी गृहीत धरायला नको. पालक व मित्रपरिवार यांच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनातील प्रत्येक अस्ताव्यस्त, लाजिरवाण्या, आनंदीत, आणि दयनीय परिस्थितीत खंबीरपणे आपल्या बाजूने उभे असणारे म्हणजे भाऊ – बहीण. असे म्हणतो की आपल्या कठीण परिस्थीत आपल्याला शाळा व महाविद्यालयातील सवंगड्यानी पाहिलं आहे, मदत केली आहे, पण त्या प्रसंगातून सावरताना सर्वात मोठा पाठिंबा घरी पडद्याआड असणाऱ्या आपल्या भावंडांचा होता हे आपण विसरतो. आपल्या नकळत न बोलता आपल्या भावना जाणून घेऊन ते आपलं मन वाचत असतात, ऐकत असतात.
मोठा भाऊ, मोठी बहिण हे लहान्या भावंडासाठी दुसरे आई वडीलच असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला त्रास देत असलात तरी ती तुमची जिवलग सखी आहे आणि भावाला कितीही वेळा तुम्हाला चिडवू द्या, पण कोणत्याही प्रसंगी पाठीराखा म्हणून तोच तुमच्या मदतीला धावून येईल. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील, “हे खरं नाही, भावंड आमचे गुपित गोष्टी (सिक्रेटस्) आम्हाला ब्लॅकमेल करायला वापरतात”. बरं मान्य आहे, पण कधी त्यामूळे तुम्हाला काही नुकसान, हानी झाली?
हो, हे शंभर टक्के खरं आहे की भाऊ बहिण एकमेकांचे सिक्रेटस् वापरून एकमेकांना ब्लॅकमेल करतात पण शेवटी त्यांचे सिक्रेटस् आपापसातच गुपीत म्हणून राहतात. भावंड तुमच्याशी येता जाता भांडत असतील तुम्हाला कंटाळवाणे वाटत असतील पण तेच भावंड दिवसा अखेरीस तुम्हाला हवे हवेसे वाटतील. ते म्हणतात ना, “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अगदी तसच. भावा बहिणीचं हे अतूट व निखळ नातं, तो ऋणानुबंध शब्दांमधून व्यक्त करणे जरा कठीणच आहे.
एक मोठी बहिण असल्याचा माझा हा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. वरील सगळे प्रसंग मी माझ्या लहान भावासोबत अनुभवले आहेत. आमच्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे आणि मला सांगावेसे वाटते की आपल्या लहान – मोठ्या भावंडासोबत असे घट्ट ऋणानुबंध जुळवून घ्यायला कधीही उशीर होत नाही किंवा वयाची मर्यादा नाही. या ऋणानुबंधाच्या सुंदर प्रवसातून मला जे कळले ते म्हणजे, “आई होण्यासाठी तुम्हाला बाळाला जन्म देणे आवश्यक नाही, पण लहान मूल (भाऊ – बहिण) तुमच्यातील मातृत्वाला जन्म देऊ शकतो. मी माझं भाग्य समजते माझ्या भावाची दुसरी आई म्हणून मला मातृत्वाची जाणिव झाल्याबद्दल.
असे अनुभव लेखणीच्या व शाहीच्या माध्यमाने लिहून व्यक्त करणे अवघडच आहे पण ज्यांनी हे सुख अनुभवले ते खरोखरच भाग्यवान आहेत..️
Great
Very true…it is so awesome ????
Awsm????????
Thank you everyone..keep supporting..❤️