NewIndiaForYou

We could be Anything

Example of Positive Thinking

When we were children, we were told over and over that we could be anything. Every book, every movie, every TV show, every adult always told us that we could do anything our mind were set on doing.
But what happens when you start to grow older…???
A mindset is formed and “reality” sets in. You Start to become comfortable and satisfied with being mediocre. You lose sight of your dreams, and now you are stuck meandering through your daily routine. All that is left of your dreams are faded and rejected ideas.
But what if there was a way to get those dreams and ideas back…??? To have the confidence on your own ability that you can succeed? Waking up energized, feeling positive and acting with a purpose. Imagine going back to the optimism of childhood; believing, you could be anything you wanted. What if you could control your future? What if you could do that impossible? What if you could exceed your limitations? Right now, if could, would you make a change in your life? If you’re saying yes right now, you’re in luck.
You will realize that becoming successful is a simple life choice. It’s a decision only you can make. It’s not upto anyone else but YOU. It may seem impossible now, but you haven’t even started to apply yourself. You haven’t started to take responsibility for your life. This is your one and only life. This is your one and only chance.
So, move forward to start this process of finding your true purpose. Start believing in YOU. To realize that your life is going to mean something to the world. With a little push of courage, you will become the solution to the impossible questions. You’ll realize that you deserve more out of life. You’ll become committed to your goals. You’ll become obsessed with your forgotten potential. You’ll become sick and tired of being average. What started out impossible will start to look possible.
Time to decide, time to take an action and to get it done.

आपण काहीही करू (बनू) शकतो.


जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वारंवार सांगितले जात होते की आपण काहीही करू शकतो. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक टीव्ही कार्यक्रम, प्रत्येक प्रौढ व्यक्ती आपल्याला नेहमी असे सांगत असत की मनातून जे काही ठरवलं ते आपण करू शकतो.
पण आपण मोठे होऊ लागल्यावर काय होते…??
एक मानसिकता तयार होते आणि “वास्तविकता” समोर येते. आपण जवळ जे काही आहे त्याच गोष्टीत समाधान मानून घ्यायला लागतो. दैनंदिन नित्यक्रम आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुंतून जातो की लहानपणी बघितलेले स्वप्न पुसट होऊन मनाच्या एका कोपर्‍यात विरून जातात. शेवटी उरतात फक्त स्वप्नांतील अंधुक झालेल्या कल्पना.
पण ती स्वप्नं आणि कल्पना परत मिळवण्याचा जर मार्ग असेल तर काय..??? आपण यशस्वी होऊ शकतो असा प्रबळ आत्मविश्वास आपल्याला असेल तर…? तर मग उत्स्फूर्ततेने उठा, सकारात्मक हेतूने कार्य करा आणि बालपणाच्या त्या आत्मविश्वासाकडे जाण्याची कल्पना करा, या विश्वासाने कि तुम्ही जे ठरवलं होतं ते तुम्ही करू शकता, बनू शकता. विचार करा, काय होईल जर तुम्ही तुमचं भविष्य कंट्रोल करू शकाल? काय होईल जर तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकाल? काय होईल जर तुम्ही कोणत्याही बंधनाशिवाय काम करू शकाल? आता, या क्षणी जर शक्य असलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बदल घडवून आणल का? जर तुम्ही यासाठी हो म्हणत असाल तर तुम्ही खरच नशीबवान आहात.
तुम्हाला कळून चुकेल की यशस्वी होणं हे आपल्याच हातात आहे. हा असा निर्णय आहे जो फक्त तुम्हीच घेऊ शकता. यशस्वी होणं हे कोणा दुसऱ्यावर नाही तर फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. हे आता तुम्हाला कठीण वाटू शकतं पण तुम्ही अजून तुमच्या प्रयत्नांना चल सुद्धा दिला नाहीये. स्वतःच्या आयुष्याची, स्वप्नांची जबाबदारी तुम्ही अजून घेतली नाहीये. हे तुमचं एकच आयुष्य आहे आणि या आयुष्यात तुम्हाला ही एकच संधी आहे यशस्वी होण्यासाठी.
तर आपल्या आयुष्यातील खरा हेतू आपले स्वप्न गाठण्यासाठी पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आपण या जगात आलो आपल्याला मनुष्य जीवन लाभले यात काही तरी अर्थ आहे हे समजून घ्या. थोड्या धैर्याने व प्रयत्नांनी तुम्ही स्वतः अशक्य प्रश्नांचे उत्तर बनाल. तुम्हाला जाणीव होईल की आयुष्या कडून अजून बऱ्याच काही चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही पात्र आहात. तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ व्हाल. दुर्लक्षित केलेल्या स्वत:च्या क्षमतेची जाणीव होऊन तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी वेडे व्हाल. सुरुवातीला जे अशक्य वाटत होते तेच आता शक्य आणि सहज वाटेल. 
हीच वेळ आहे निर्णय घेण्याची, क्रिया करण्याची आणि ध्येयप्राप्ती करण्याची, आपली स्वप्न पुर्ण करण्याची.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

en English
X