चिंता मुक्त भविष्यासाठी गुंतवणुकीचे महत्व
बचत म्हटली कि एक सर्वसाधारण भारतीय परिवारात खूप काही गोष्टींचा समावेश होतो कुणी मातीच्या गल्यात तर कुणी एखाद्या गोपनीय पाकिटात किंवा जस शक्य होईल तस पैसे साचवत असतो. परंतु अश्या पद्धतीने आपण पैश्यांना कामाला लावत नसतो तर त्याची किंमत कमी करत असतो. कारण महागाई मुळे पैश्याची किंमत हि सतत कमीच होत असते. त्यामुळे पैश्यांना कामाला लावणे फार महत्वाचे असते. तरी मागील काही दशकात खूप साऱ्या लोकांना याच महत्व पटलं असून ते लोक पैश्यांना कामाला लावून खूप श्रीमंत झाले आहेत आणि सतत होत आहेत. उदा. बँकेत FD करणं, सावकारी करून, शेअर मार्केट मध्ये गुंतवून आणि बरेच काही मार्गांनी, आपण यातलेच काही आधुनिक मार्ग बघणार आहोत.