बचत म्हटली कि एक सर्वसाधारण भारतीय परिवारात खूप काही गोष्टींचा समावेश होतो कुणी मातीच्या गल्यात तर कुणी एखाद्या गोपनीय पाकिटात किंवा जस शक्य होईल तस पैसे साचवत असतो. परंतु अश्या पद्धतीने आपण पैश्यांना कामाला लावत नसतो तर त्याची किंमत कमी करत असतो. कारण महागाई मुळे पैश्याची किंमत हि सतत कमीच होत असते. त्यामुळे पैश्यांना कामाला लावणे फार महत्वाचे असते. तरी मागील काही दशकात खूप साऱ्या लोकांना याच महत्व पटलं असून ते लोक पैश्यांना कामाला लावून खूप श्रीमंत झाले आहेत आणि सतत होत आहेत. उदा. बँकेत FD करणं, सावकारी करून, शेअर मार्केट मध्ये गुंतवून आणि बरेच काही मार्गांनी, आपण यातलेच काही आधुनिक मार्ग बघणार आहोत.
पैश्याला कामाला लावणे म्हणजे नेमकं काय ? मागील शतकातपासून बँकिंग ह्या व्यवसायाने खूप प्रगती केली आहे. लोकांना सर्व काही आता मोबाईल द्वारे पेपर विरहित व्यवहार करणे सोपं झालंय. बँकिंग व्यवहाराची सोपी व्याख्या सांगायची झाली तर, एखाद्या कडून विशिष्ठ व्याज दराने पैसे घेऊन एखाद्या गरजू ला त्यापेक्षा जास्त दराने पैसे देणे होय. अश्याच पद्धतीने जास्त करून बँक व्यवहार चालतो. एखादा व्यक्ती पैसे जमा करून बँकेत बचत करतो विशिष्ठ कालावधी साठी त्यासाठी बँक त्याला विशिष्ठ व्याजदराने (६ – ८%) दराने परतफेड करते.
म्युच्युअल फंड – याबद्दल सर्वांनी ऐकलंच असेल, हा एक आधुनिक युगाचा बचतीचा एक सोपा आणि फायद्याचा मार्ग आहे ज्यात पैसे गमावण्याची रिस्क कमी आणि कमवण्याची जास्त असते. आता हे काम कसं करत, आपण एक उदाहरण घेऊ , मनीष नावाचा मुलगा आहे त्याची महिन्याची कमाई २०००० आहे सर्व खर्च काढून त्याच्या कडे ५००० शिल्लक असतात तर तो काय करेल, त्याच्या बँकेशी किंवा एखाद्या म्युच्युअल फंड च्या माहिती देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करेल, तो व्यक्ती त्याला वेगवेगळ्या कंपनीच्या, बँकेच्या प्लॅन्स ची माहिती देईल. त्यानुसार मनीष रिस्क पाहून, परतीची टक्केवारी पाहून एखादा प्लॅन निवडेल व दर महिन्याला त्याच्या खात्यातून ५००० वजा होतील व त्या म्युच्युअल फंड च्या खात्यात जमा होतील. मनीष त्याचे पैसे किती व्याजदर कमावताय हे सुद्धा बघू शकेल. म्युच्युअल फंड मधला आपला पैस हा त्या कंपनी मार्फत सरकारी बॉण्ड्स, काही बँकिंग क्षेत्रात तर काही शेअर मार्केट मध्ये गुंतवला जातो त्यामुळे यात रिस्क खूप कमी असते. यातली जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाची ताकद पाहायची असेल तर पुढच्या लिंक वर जाऊन तुम्ही किती वर्ष गुंतवणूक करणार आहेत व किती वर्षांसाठी हे टाकून बघू शकता. https://www.iciciprulife.com/insurance-guide/financial-planning-tools-calculators/power-compounding-calculator.html
शेअर मार्केट / भांडवल बाजार
शेअर मार्केट म्हटलं म्हणजे अनेकांच्या मनात तो एक जुगार आहे सट्टा बाजार आहे असं वाटत परंतु हे सर्व गैरसमज आहेत आणि आपण ते आज काही प्रमाणात दूर करू. समजा मनीष एक कंपनी चालवतो XYZ नावाची पण मनीष ला त्याचा बिझनेस वाढवायचा आहे तर मनीष काय करेल, समजा मनीष ला १०,०००,०० (१० लाख ) रुपये लागणार आहेत तर मनीष NSE ( National Stock Exchange ) म्हणजेच सरकारी ऑथॉरिटी कड आपली कंपनी सादर करायला जाईल आणि आपल्या कंपनी चा IPO (Initial Public Offering) लाँच करेल तर तो त्यात एका शेअर ची किंमत १०० ठेऊन १०००० शेअर्स लाँच करेल आणि विकायला काढेल आणि अश्याप्रमाणे १० हजार शेअर्स १०० प्रमाणे शेअर्स मार्केट ला लिस्ट होतील व जसे जसे हे शेअर्स विकले जातील तस तस भांडवल मनीष च्या कंपनी ला मिळत जाईल व पूर्ण शेअर्स विकले गेले तर मनीष १० लाख रुपये मिळवण्यात यशस्वी होईल व तो सर्व पैसे आपल्या कंपनीच्या विकासासाठी लावेल. आता ह्याच कंपनी ला जर नफा झाला तर त्या शेअर्स ची किंमत वाढेल व १०० च्या शेअर्स ची किंमत १२०, १५० किंवा २०० देखील होऊ शकते तर ज्यांनी १०० प्रमाणे १० शेअर्स म्हणजे १००*१०=१००० चे शेअर्स घेतले असतील तर त्यांची किंमत २०० प्रमाणे २००० होईल व त्यांना दुप्पट चा नफा होईल पण जर त्याच कंपनी ला तोटा झाला तर त्या शेअर्स ची किंमत १०० वरून ९० किंवा ८० पण येऊ शकते पण हे खूप कमी वेळा होता जेव्हा आपण विचार करून शेअर्स घेत नाहीत. यात अजून एक गोष्ट येते ती म्हणजे डिवीडेंट, डिवीडेंट म्हणजे कंपनीला झालेल्या नफ्यातून शेअर होल्डर्स ला देण्यात येणारी ठराविक रक्कम जी कंपनी ठरवते. अश्या साध्या पद्धतीत शेअर्स मार्केट चा व्यवहार चालतो आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवायला SEBI (Securities and Exchange Board of India) हि ऑथॉरिटी काम करते त्यामुळे यात काळा बाजार होत नाही. जस आपण १९९२ SCAM ह्या चित्रपटात पाहिलं.
शेअर मार्केट च ज्ञान हि काळाची गरज होत चालली आहे कारण महागाई खूप वाढत आहे आणि लोकांचं उत्पन्न त्या मानाने वाढत नाही अश्याने श्रीमंत श्रीमंत होत चाललंय आणि गरीब गरीब. त्यामुळे FINANCIAL EDUCATION खूप महत्वाचं आहे. शेअर मार्केट मध्ये शिकण्यासारखं खूप आहे जस कि इंट्रा डे, Future and option (F & O) परंतु सर्व सामान्याने यात न पडता जास्त काळासाठी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आपलं भविष्य सुरक्षित केलं पाहिजे.
शेअर मार्केट जगात प्रेरणेसाठी अनेक उदाहरण आहेत जस कि वोरण बफेट, राकेश झुंजूनवाला, राधाकिशन दमाणी आणि अशे लाखो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सर्व तर खर आहे पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची कशी, कुठून अकाउंट उघडायचं ? त्यासाठी काही विशेष प्रक्रिया असते का? UPSTOX वर DEMAT ACCOUNT उघडायला यावर क्लिक करा https://bv7np.app.goo.gl/R5RQ
तर हो…यासाठी विशेष अकाउंट असत आणि हे कुणीही उघडू शकत…जस आपण बँकेत अकाउंट उघडतो सेविंग, करंट, क्रेडिट तसेच अकाउंट शेअर मार्केट साठी पण असत त्यालाच डिमॅट म्हणजेच Dematerialized Account म्हणतात. ह्या अकाउंट वरून आपण आपल्या शेअर्स ची देवाण घेवाण, त्याचा नफा तोटा रोज तपासू शकतो. DEMAT अकाउंट उघडायला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जस कि UPSTOX , GROWW , ANGEL BROCKING , ZERODHA यात प्रत्येकाच्या सुविधा आणि देवाण घेवाणीचे चार्जेस वेगवेगळे आहेत.
तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वरून आपले DEMAT अकाउंट UPSTOX या प्लॅटफॉर्म वरून उघडू शकतात यात मी संपूर्ण माहिती अकाउंट कस उघडावं हे चित्राच्या स्वरूपात आणि संपूर्ण कागदपत्र यांची आवश्यकता या सोबत दिली आहे. https://newindiaforyou.com/demat-account-for-share-market/
शेअर मार्केट हे खूप मोठं पैश्यांचं समुद्र आहे यात नफा पण आहे आणि थोडा फार तोटा पण, पण आपण जर चांगल्या कंपनी चे शेअर्स जस कि रिलायन्स ,टाटा,अडाणी, ब्रिटानिया, ITC व इतर सरकारी कंपन्या यांचे शेअर्स घेतले तर जास्त काळासाठी ठेऊन आपण यातून नफा हमखास मिळवू शकतो. फक्त सय्यम ठेवायला हवा. माझे तर मत आहे कि महिन्याच्या उत्पन्नातून २०% काढून दर महिन्याला त्यांची गुंतवणूक शेअर मार्केट मध्ये केलीच पाहिजे जेणेकरून आपली न कळत बचत होत राहील आणि आपला पैसे देखील कामाला लागेल.
शेअर्स कशे घ्यायचे आणि संपूर्ण शेअर मार्केट च्या माहिती साठी youtube.com वर अनेक चॅनेल आहेत जस कि https://www.youtube.com/user/rachanaphadke (CA Rachana Phadake) https://www.youtube.com/channel/UCsNxHPbaCWL1tKw2hxGQD6g (Asset Yogi) https://www.youtube.com/channel/UC4urAVbaOZmI5YSqbA_ममत्व (Marathi Sanket) आणि अशे खूप सारे.