शेती शेतकरी किसान हे ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर डोळ्यासमोर एकच चित्र येत असेल ना? जसे माती, फाटलेली धोती वाला माणूस, बैल, गरीबीची परिस्थिती, मातीचा तोडकं मोडकं घर. पण अहो काय करता, आम्हाला जगाला खाऊ घालावा लागतो ना मातीत राबलो नाही तर पोट कसे भरणार.
आज तुम्हाला मी स्वतः अनुभवलेली सर्व दृश्य सांगणार अर्थात माझ्या शब्दातून दाखवणार.
भारताला शेकडो काय हजारो वर्षांचा शेतीचा इतिहास लाभलाय, अर्थात लाभेलच ना पोट भरायला साधनच काय असतं उत्पन्नाचं. अन्नधान्य यांनी संपन्न असलेला आपला भारत देश अनेक संकटातून आपल्याला अन्न पुरवतोय. सावकारी, उच्च वर्गाच्या शेतकऱ्यांनी नीच्च वर्गाच्या शेतकऱ्यांचा केलेला छळ, इच्छा नसताना हिसकावलेल्या जमिनी, इंग्रजांच्या काळात लावले गेलेले कर, रयतवारी, कायमधारा पद्धती, निसर्गाने सोडलेली साथ यांनी शेतकरी आधीपासूनच त्रासलेला आहे.
आत्ताच्या काळात देखील व्यापारींची मनमानी, उत्पन्नाचा कमी भाव, वाढती रोगराई, भाववाढ यांनी शेतकरी खालीच जात आहे.
सध्याच्या धावपळीच्या आणि फास्ट युगात कोणाला कष्टाचे काम करण्याची इच्छा नसते, त्यामुळे होणारी मजुरांची टंचाई हि देखील शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या आहे.
शेती या व्यवसायात शेतकरी सोडून सर्व श्रीमंत होत आहेत. उदाहरणार्थ : व्यापारी, वाहतूक, खत दुकानदार, पाईप-ठिबक दुकानदार , ट्रॅक्टर विक्री वाले, इतर हार्डवेअर दुकानदार सरकार सर्व श्रीमंत होत आहे पण राबतो कोण तर शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा.
आमच्याकडे लाखो करोडोंचा भाव असलेल्या जमिनी आहेत हो, पण काय करता विकू नाही ना शकत. कारण, शेतीला आम्ही आई मानतो आणि जमीन विकली तर तुमची पोटं कशी भरणार.
खूप साऱ्या अडचणी असतात पेरणी पासून, बियाणे खरेदी करणे, नांगरणी, मजूर मिळवणे, ढगांकडे आस लावून पावसाची वाट बघणे, मानसून कुठपर्यंत आला हे सतत टीव्ही वर बघत राहणं, एकदाची पेरणी झाली की पाऊस कधी येईल या आशेने सतत त्रासात राहणं आणि हे सर्व नीट पार पडलं की हळू हळू सहा महिने होतात आणि ऐन पिक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने उभे पीक जमीनदोस्त होतं. तुम्ही विचारही नाही करू शकत अशावेळी शेतकऱ्याला काय जाणवतं डोक्यावर कर्ज, दुकानदाराच्या उधार्या, काहींच्या मुला-मुलींचे लग्न, घराचं बांधकाम हे सर्व त्या पिकासोबत जमीनदोस्त होताना दिसतं.
तरी खूप सारे लोक म्हणतात शेतकरी करतो काय?त्याला कर्जमाफी का मिळते? त्याला कर (टॅक्स) का नाही? मी म्हणतो या लोकांनी एकदा शेती करून बघावी.
शेतकऱ्यांचे दुःख सांगायला हे शब्द कधीच पूर्ण पडणार नाहीत. कारण, दुःखाचं आभाळ कधीच संपत नाही.
Farming and Struggle of Farmer
Whenever you say or hear a word ‘Farmer’ only one image strikes through your mind is a man with torn dhoti, mud all over his body, having a pair of bulls, living in a broken house with poverty, isn’t it? But what to do, we (farmers) have to feed the world, if we do not work in soil, how will we manage to satisfy our hunger.
Today I will discuss few scenes witnessed by me, of course in my own words.
India has a history of about thousands of years of agriculture and it has to as there is no source of income in rural areas rather than farming. Prosperous India has been providing us with food (grains) throughout many crises. Farmers are already been in trouble because of moneylenders, persecution of lower caste farmers by the upper caste, land snatched against their will, taxes levied during British rules, perpetual practices and uneven conditions due to nature.
Even in the present times, due to the arbitrariness of traders, low prices of income, rising prices of agricultural tools, and now this pandemic has lead farmers down.
In today’s fast-paced world, no one wants to work hard, resulting in a labor shortage.
In this field (or say a business) of agricultural all are getting rich except farmers. For example : traders, transporters, drip-pipe sellers, fertilizer dealers, shopkeepers and other hardware shopkeepers all those are becoming rich but the true efforts and struggles are of the farmer, breadwinner of the world.
Farmers do have lands worth lakhs or in crores, but they can’t sell them. Because, they worship their land and agriculture and if they sell it, how will they earn. It’s the only source of survival for them.
There are lot of problems starting from buying seeds, ploughing, sowing, getting labor, utilizing all the efforts and money in the land and then waiting for monsoon to start with a hope of better yields. Total 5-6 months would pass until the entire process is completed and the grown crops get eroded sometimes due to unseasonal and heavy rainfall.
You can’t even imagine what farmers go through their entire life facing such situations, no one can feel the pain when he (farmer) has a debt on his head, loan from shopkeepers, with all this consequences he has to look after his family, managing marriages of his son/daughter.
However, a lot of people say, what does farmers do? Why government frees them from paying taxes? I would suggest those people to try farming just for once in life then they’ll actually know what it is to struggle, work and invest your money and time for entire year in a land and leave all the results to nature.
These words will never be enough to express the grief of the farmers, because grief never ends.