महाराष्ट्राने कसे महा-राष्ट्र असे नाव लौकिक मिळवले
१५ ऑगस्ट १९४७ भारताला इंग्रजांच्या जुलमी शासनाकडून स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतात महाराष्ट्र या नावाने आपले राज्य नव्हते. १९५० च्या भारताच्या मूलघटनेत राज्यांची विभागणी ४ गटात करण्यात आली होती, त्यात बॉम्बे प्रांत हे एक द्विभाषिक राज्य होते ज्यात आताचे गुजरात व महाराष्ट्र ह्या दोन राज्यांचा गट होता. परंतु मराठी भाषिकांना भाषेच्या आधारावर स्वतंत्र राज्य हवे होते ज्या साठी ‘स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ ‘ राबवण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्र हे मराठी माणसाचे स्वप्न होते व त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अनेकांना तुरुंगवास सहन करावा लागला. १०५ लोकांचे बळी गेले. सेनापती बापट, एस.एम.जोशी , आचार्य अत्रे , कॉ.श्रीपाद अमृत डांगे, भाई उद्धवराव पाटील, आदींच्या समर्थ नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. परंतु पं.नेहरूंचा संयुक्त महाराष्ट्र ला स्पष्ट विरोध होता व ते त्या मतावर ठाम होते, पण संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमुळे मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत झाला. मतभेद , राजकारण विसरून व या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी एकत्र आला. विविध भागाच्या नेत्यांनी, लोकांनी जस नागपूर, मराठवाडा, सातारा आदी भागातील लोकांनी खूप सार बलिदान, श्रम अर्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुरुषांप्रमाणे स्त्रियांचा देखील मोलाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न चुलीपर्यंत पोहचवून स्त्रियांना स्वयंपाक घरातून ओढण्यासाठी तन-मन अर्पण करणाऱ्या कॉ.अहिल्या रांगणेकर, कॉ. तारा रेड्डी, उषा डांगे, कॉ.कमल भागवत , विमला बागल, मालिनी तुळपुळे कार्यकर्त्या अग्रेसर होत्या.
अश्या ह्या असंख्य लोकांच्या अथक परिश्रमाने, नेतृत्वाने, बलिदानाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन निर्माण झाले.
आपण थोडक्यात महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता थोडे महाराष्ट्राबाबत आकडेवारी आणि विविधता जाणून घेऊ.
क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्राचा भारतात ३रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १२ कोटी आहे व लोकसंख्येच्या बाबतीत भारतात २रा क्रमांक. प्रशासकीय बाबींचा विचार करता महाराष्ट्रात ६ विभाग,३६ जिल्हे, ३५८ तालुके व ४३६६५ खेडी आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र , खान्देश, मराठवाडा व विदर्भ असे ५ प्रादेशिक विभाग आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच रक्षण करत अरबी समुद्र आहे. त्यातच थोडं पूर्वेकडे सरकलं कि उंच असा अवाढव्य व प्रादेशिक दृष्ट्या महत्वाचा , महाराष्ट्राचं वादळापासून संरक्षण करणारा सह्याद्री पर्वत आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पठारी भाग आहे ज्यात प्रामुख्याने शेती, उद्योग व दळणवळण अश्या आर्थिक बाबी होतात. GDP च्या बाबतीत आर्थिक बाबतीत महाराष्ट्र हा भारतात आधीपासूनच अग्रेसर आहे.

शिक्षण, नवीन उद्योग, संशोधन, खेळ भाषेची विविधता, राहणीमान, संस्कार, आपआपसातील गोडी, एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती, आधुनिक जगाच ज्ञान या साठी महाराष्ट्राचे नावलौकिक अख्या जगभर आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेसोबत विविध प्रादेशिक भाषा देखील बोलल्या जातात. भारताप्रमाणे महाराष्ट्रात विविधता आढळून येते जसे कि भाषा, राहणीमान, पोशाख.

इतका थोर इतिहास लाभलेले आपले राज्य आज काही संकटातून जात आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आपण मागे न राहावं यासाठी तरुणांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या मनात मराठी असल्याचा, मराठी भाषेचा व आपल्या महाराष्ट्राचा मान अभिमान बाळगला पाहिजे.
||जय हिंद||जय महाराष्ट्र||

How Maharashtra got the name Maha-Rashtra
August 15, 1947 India became independent from British rule. At the time of independence, India did not have a state called Maharashtra. In the Constitution of India of 1950, the states were divided into four groups, with the province of Bombay being a bilingual state comprising the present two states of Gujarat and Maharashtra. But Marathi linguistic wanted an independent state on the basis of language for which the ‘Independent Maharashtra Movement’ was implemented.
United Maharashtra was the dream of a Marathi man and many had to endure imprisonment for the fulfillment of that dream. 105 people were killed. The state of Maharashtra was formed under the able leadership of Senapati Bapat, SM Joshi, Acharya Atre, Co. Shripad Amrit Dange, Bhai Uddhavrao Patil, etc.
But Pandit Nehru clearly opposed formation of United Maharashtra and he was adamant on that opinion, but due to the demand of United Maharashtra, the self-esteem of Marathi people was awakened. Forgetting all the differences, politics and keeping all these things aside, Marathi people came together for the goal of a united Maharashtra. Leaders from different parts of the country, and even people from Nagpur, Marathwada, Satara and other areas made a lot of sacrifices and labor. Like men, women also played an important role in the United Maharashtra movement. Co. Ahilya Ranganekar, sacrificed her frame and mind to draw women out of the kitchen by taking the issue of United Maharashtra to them. Tara Reddy, Usha Dange, Co. Kamal Bhagwat, Vimala Bagal, Malini Tulpule were the leading activists.
Thanks to the tireless work, leadership and sacrifices of so many people that lead to formation of United Maharashtra. Our state of Maharashtra, came into being on May 1, 1960.
We have briefly tried to know the history of the formation of Maharashtra. Now let us know a little about the statistics and diversity of Maharashtra
Maharashtra ranks 3rd in India in terms of area. Maharashtra has a population of about 12 crores and ranks 2nd in India in terms of population. Considering administrative matters, Maharashtra has 6 divisions, 36 districts, 358 talukas and 43665 villages. There are 5 regional divisions namely Konkan, Western Maharashtra, Khandesh, Marathwada and Vidarbha. Protecting the west coast of Maharashtra, there is the Arabian Sea.
The eastern part of Maharashtra is a plateau with mainly economic activities such as agriculture, industry and transportation. Maharashtra is already the leading economy in India in terms of GDP.
Maharashtra is known all over the world for its education, new industries, research, diversity of sports language, way of life, culture, love for each other, attitude of helping each other, knowledge of modern space. Apart from Marathi, various regional languages are also spoken in Maharashtra. Like India, Maharashtra has diversity of languages, lifestyles, costumes, etc.
Our state, which has such a great history, is going through some crisis today, so it is necessary for the youth to take initiative so that we do not lag behind in terms of education and finances. Everyone should be proud for being Marathi and should have respect for Marathi language and our Maharashtra.
|| Jai Hind || Jai Maharashtra ||
Valuable Information Brother… Special The Part Of History
Keep It Up