NewIndiaForYou

To be in Love is Eternal feeling….

to be in love

To be in LOVE

While many of us may have sensed it intuitively and we all know “Love is all that we need”. Love is an universally valued attribute and defining it in behavioral terms can be a challenge. It is the feeling of eternity that everyone craves for. I too always craved for such love from someone who can walk with me throughout the journey of life regardless of any hurdles.
It all started few years back at a family function. He was the one among the many of my distant relatives I heard about in my tenth grade. He was few years elder than me and the first time when I saw him I felt little goosebumps all over my body and his eyes were too locked with mine. We both were lost in our own thoughts recollecting everything we heard about one another from our family members and tried to match the imaginary reflection of ours with the real one. It was our first ever meet and it started with a stare game.
I never liked talking to guys before but this time I felt an extreme urge to have endless talks with him, to know him more I wished that stare game would never end, but it has to, as it was just the game. None of us won the game but somewhere we both won each other’s heart forever and that victory was overwhelming.


That few days family function was the beginning of our new journey towards the path of love, affection and lifelong happiness. We became friends and within few months the relation blossomed beyond friendship but still we both tried to keep the truth secret. I was extremely craving for him and wanted him to know how much I loved him, I wanted him to feel how much special he was for me. Days gone, months passed, seasons changed and our feelings too were at the impulse surge and almost about three years later again we met at another family function.
It was the wedding ceremony of my cousin. Happiness was in the air, wherever we looked there were happy faces. Wedding is the only thing where everyone else enjoys more than the bride and the groom and so we did. We both were more than friends and less than lovers by that time and we both didn’t missed a single chance of chasing each other and to flirt as well. He was the first guy in my life for whom I felt such warmth and emotions and I wished to cherish all that emotions and feelings forever with the same person.

As it was the wedding function everyone used to get tired by the end of day and slept wherever they could occupy some space after finishing all the stuffs. One fine night I was awake till late night and went outside the room and sat near the stairs looking at the glittery shining stars and feeling the cold breeze of air all over my body. Looking at the dark sky I suddenly gazed at the dimmy reflection of dark shadow onto the ground and it ran a scary hell out of me as that shadow was coming near me. I was about to scream when I heard a gentle voice asking me “Why you are awake this late?” as I turned back I saw him standing behind me. He sat beside me and accompanied me looking at the beauty of that cold and freezy night all over the glittery stars. Then the conversation continued till we both saw the next morning sunrise together. That late night conversation and quality time we both spent together brought us closer emotionally and that night both of us confessed our love and promised to be with each other till the end of life.
That night I believed, God has a best love story for everyone and ours was just started.

त्याची अन् तिची प्रेमकथा

आपण सर्वांना कधी ना कधी अंतर्मनातून ही अनुभूती आलीच असेल की “प्रेम सर्वांसाठी अत्यावश्यक आहे”. प्रेम म्हणजे विश्वातील मूल्यवान गुणधर्म आहे आणि त्याची व्याख्या वर्तनात्मक दृष्टीने सांगणे अशक्यचं आहे. ती एक अनंतकाळापासून अस्तित्वात असणारी भावना आहे जीची प्रत्येकाला अभिलाषा असते. मी स्वतः देखिल कायम अशा प्रेमाची अतोनात आकांशा बाळगली जो कोणत्याही अडथड्यांना न जुमानता आयुष्याच्या प्रवासात माझी साथ देईल.
याची सुरुवात काही वर्षांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान झाली. “तो” माझ्या लांबच्या नातेवाईकांपैकी एक होता ज्याच्या बद्दल मी दहावीत असताना फार काही ऐकल होतं. तो माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठा होता, त्याला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं त्याक्षणी अंगावर जणू शहारा आला होता आणि आम्हा दोघांचे डोळे एकमेकांना निरखून पाहत होते. आम्ही दोघेही स्वतःच्या विचारात हरवलो होतो, आम्ही कुटुंबातील सदस्यांकडून एकमेकांविषयी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवून करून स्वतःच्या मनातील एकमेकांचं कल्पनिक प्रतिबिंब वास्तविक देहाशी जुळवण्याचा प्रयत्न करत होतो. ही आमची पहिलीच भेट होती आणि ती टक लावून पाहण्याच्या खेळाने (Stare Game) सुरू झाली.
यापूर्वी कधीच मला मुलांबरोबर बोलणे आवडत नव्हते पण यावेळी त्याच्याशी बोलण्याची, त्याला अजून जाणून घेण्याची तीव्र इच्छा मला जाणवली आणि वाटत होते हा खेळ कधीच संपू नये असंच त्याच्या डोळ्यात मी पहात राहावं पण शेवटी तो खेळ होता त्याला संपवणं भाग होतं. आमच्यापैकी कोणीही तो खेळ जिंकलं नाही पण कुठेतरी आम्ही दोघांनी एकेमकांची मने कायम स्वरुपी जिंकली होती आणि ते यश जबरदस्त होतं.
प्रेमाच्या वाटेवर ही आमच्या आयुष्याची नवी सुरुवात होती आणि हा कौटुंबिक कार्यक्रम आमच्यासाठी आल्हाददायक आठवणी देणारा ठरला. आमची मैत्री झाली आणि काही महिन्यांतच आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं तरी आम्ही दोघांनी त्याला प्रेमाच्या अलीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात त्याच्याविषयी तळमळ होती, मला त्याला सांगायचं होतं की तो माझ्यासाठी किती खास आहे, माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. दिवस गेले, महिने गेले, ऋतू बदलले आणि त्याचबरोबर आमच्या भावना उत्कंठतेने वाढू लागल्या. नशिबाने तीन वर्षानंतर पुन्हा आमची भेट झाली ती एका लग्नसमारंभात.
माझ्या भवाचं लग्न होतं, सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता जिथे पाहू तिथे सगळ्यांचे आनंदीत व हसरे चेहरे होते. लग्न असा समारंभ आहे जिथे वर आणि वधू पेक्षा इतर मंडळी जास्त धमाल करतात आणि ती आम्हीही केली. त्यावेळी आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे होतं, आम्ही दोघांनीही इश्कबाजी करण्याची एकही संधी सोडली नाही. तो माझ्या आयुष्यातील पहिला व्यक्ती होता ज्याच्यासाठी मी इतकी तळमळत होते आणि ही भावना मला कायमस्वरूपी त्याच व्यक्तीबरोबर अनुभवून जतन करून ठेवायची होती.
लग्नाचा कार्यक्रम असल्याने प्रत्येकजण दिवसाअखेरीस थकून जात आणि काम आटोपल्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे झोपून जात होते. एके रात्री मी उशिरापर्यंत जागी होती, मी त्या गर्दीच्या खोलीतून बाहेर अंगणातील पायरीवर जाऊन बसले आणि त्या काळोखात मंद प्रकाश देणाऱ्या रात्रचांदणी कडे एक टक बघत बसले. वाऱ्याचा मंद झुळूक माझ्या अंगाला स्पर्शून जात होता. त्या टीम-टीमनाऱ्या आकाशाकडे बघत असताना अचानक माझं लक्ष जमिनीवर पडणाऱ्या सावलीकडे गेलं आणि माझ्या अंगावर भीतीचा शहारा आला कारण ती सावली हळू हळू माझ्या जवळ येत होती. मी किंचाळणारचं होते की तितक्यात मला प्रेमाने कोणी विचारले, “इतक्या उशिरापर्यंत जागी का आहेस?” आणि जसं मी मागे वळून पाहिलं तर तो माझ्या मागे उभा होता. मग तो ही माझ्या साथीला शेजारी बसून त्या थंड आणि मधुर रात्रीची सुंदरता पाहू लागला. रात्रभर आमचा संवाद चालला आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय आम्ही सोबतचं बघितला. त्या रात्री झालेला आमचा संवाद आणि आम्ही सोबत व्यतीत केलेला तो वेळ यामुळे आम्हीं एकमेकांच्या अजूनच जवळ आलो आणि त्या रात्री दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले.
त्या रात्री मला विश्वास झाला की देवाने प्रत्येकासाठी सर्वोत्कृष्ट प्रेमकथा लिहून ठेवली आहे आणि आमच्या प्रेमकथेचा नुकताच आरंभ झाला होता.

6 thoughts on “To be in Love is Eternal feeling….”

  1. अप्रतिम heart touching story.. ????????बंध रेश्माचे ????जुळून आल्या रेशीम गाठी ????❤️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

en English
X